Top News

अभाविपचे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या बसच्या समस्यांचे विभाग नियंत्रकाना निवेदन. अभाविपचा आंदोलनाचा इशारा


धाराशिव - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव शाखेच्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांना बसशी संबंधित भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने जे विद्यार्थी धाराशिव शहरातून किंवा इतर गावातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकण्यासाठी येतात त्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ०९:०० वाजता ज्या बसेस त्या महाविद्यालयासमोरुन जातात त्या बसेस तिथे थांबाव्यात. तसेच सायंकाळी ०५:०० च्या नंतर तुळजापूर वरून येणाऱ्या बस ही थांबाव्यात. तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर बस थांबा असून देखील बस थांबत नाही त्या त्वरित थांबवण्यात याव्यात. बस थांबा असून पण ज्या ठिकाणी बस चालक बस थांबवत नाहीत त्या बस चालकावर कार्यवाही करण्यात यावी. वरील सर्व समस्या येत्या ३ दिवसात सोडविण्यात याव्यात. अन्यथा आपणास विद्यार्थ्यांच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल. अशा इशारा शहर मंञी कु. साक्षी पाटील यांनी दिला.

(सदरील प्रसिद्धी पञक धाराशिव शहर कार्यालय मंञी कृष्णा कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केले आहे)

Post a Comment

Previous Post Next Post