Top News

कामगारच निघाला दरोडेखोर, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी उघडकीस आणला कट.०२ आरोपी व ४२,००० हजारांचा मुददेमाल पोलीसांचे ताब्यात....


दि.२८.०३.२०२६ रोजी दाळींब येथे फिर्यादी नामे हृषिकेश जाधव, रा लातूर यांना दाळींब येथे सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर ०६ अनोळखी इसमांनी त्यांची गाडी आडवून त्यांना मारहाण करून त्यांचेकडून मुरूम येथून माल उतरवून मिळालेले रोख रक्कम १,१४,००० रू चोरून नेले. म्हणून पोस्टे मुरूम गुरनं ७७/२०२६ क ३१०(२), ३११ भान्यासं अन्वये दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक, धाराशिव यांनी तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना आदेशित केले होते.

दि ३१.०३.२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणातून प्राप्त माहितीवरून ०२ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील एक जण यातील फिर्यादी यांनी उज्वला किराणा, मुरूम या दुकानात त्यांचा माल उतरवून रोख रक्कम १,१४,००० रू. घेतले होते, त्याच दुकानात कामाला असल्याचे दिसून आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, आरोपी नामे अभिषेक राजेंद्र कावडे, वय १९ वर्षे, रा कंटेकूर याने फिर्यादींकडे रोख रक्कम असल्याचे पाहीले होते. त्यावेळी त्याने त्याचे इतर साथीदारांना सदरबाबत सांगून फिर्यादींना रस्त्यात आडवून रक्कम लुटायचा कट केला. त्याप्रमाणे वर नमुद आरोपीने त्याचे मोटारसायकलवर व इतर साथीदारांनी पांढ-या रंगाच्या ईनोव्हा कारमधून फिर्यादी यांचे वाहनाचा पाठलाग केला व त्यांना दाळींब येथे महामार्गावर आडवून फिर्यादी व त्यांचे वाहनाचा ड्रायव्हर यांना गाडीतून उतरवून गंभीर मारहाण करून त्यांचेकडील रोख रक्कम १,१४,००० रू दरोडा टाकून चोरून नेले होते.

सदर गुन्हयात आरोपी नामे अभिषेक राजेंद्र कावडे, वय १९ वर्षे व दत्ता व्यंकट जमादार, वय ३३ वर्षे दोघे रा. कंटेकूर, ता. उमरगा यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून त्यांचे वाटयास आलेली रक्कम रोख २०,००० रु व दोन मोबाईल असा ४२,००० रूपयांचा मुददेमाल जप्त केला असून त्यांचे इतर ०६ साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नमुद आरोपी व जप्त मुददेमाल पुढील कारवाईस्तव पोस्टे मुरूम यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव मा. श्रीमती शफकत आमना अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, चापोह नागनाथ गुरव, रत्नदिप डोंगरे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post