धाराशिव : येथील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धेचे यशस्वी आयोजन सोमवारी (दि. ३०) करण्यात आले. प्राचार्य डॉ. कायला कृष्ण मुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. संजय आंबेकर व सहसमन्वयक प्रा. कैलास शिकारे यांनी स्पर्धेचे नियोजन केले.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. व्ही. जी. शिंदे होते. उद्घाटनप्रसंगी डॉ. अभय शहापूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर पारितोषिक वितरण समारंभाला अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील उपस्थित होत्या.
स्पर्धेत महाविद्यालयातील १६ संघांनी सहभाग नोंदवला. विविध अभिरूप न्यायालयांमध्ये झालेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कु. सुशांत मिंधे, कु. मयुरी राजेनिंबाळकर व कु. प्रतीक्षा शिराळ यांच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर कु. ऋषिकेश जाधव, कु. गणेशसिंग किल्लेदार व कु. अभिषेक मोरे यांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. उत्कृष्ट युक्तिवादासाठी कु. ऋषिकेश जाधव याला प्रथम क्रमांकाचा सन्मान देण्यात आला.
स्पर्धेसाठी धाराशिव न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञांनी न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिले. तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सार्थक सुरवसे व सुशांत मिंधे यांचा गौरव करण्यात आला.
Post a Comment